मंगरूळ नवघरे प्रतिनिधी :
इसोली येथे एका ७० वर्षीय वृद्धाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
रामकिसन ज्ञानबा गवळी (वय ७०) असे मृत वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी समाधान सुपेकर यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. इसोली येथील रहिवासी असलेल्या रामकिसन गवळी यांचा मृतदेह विठ्ठल येवले यांच्या मुंगी शिवारातील गट क्रमांक १४९ मधील शेतातील विहिरीत आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
रामकिसन गवळी यांचा मृत्यू नेमका कसा झाला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. घटनेचा पुढील तपास ठाणेदार जयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार दिलीप तोंडे करीत आहेत.
इसोली येथे ७० वर्षीय वृद्धाचा विहिरीत बुडून मृत्यू
0
9
4
8
3
3
Users Today : 5
Leave a comment