बुलढाणा प्रतिनिधी :
नांदुरा तालुक्यातील बरफगाव येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीस काठीने मारहाण केल्याची घटना १९ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास ग्रामपंचायत चौकात घडली.
अजाबराव दादाराव झांबरे (वय ४०, रा. बरफगाव, ता. नांदुरा) हे शेतमजुरी करतात. ते ग्रामपंचायत चौकात उभे असताना रुषीकेश देवेंद्र झांबरे (वय २२) याने येऊन त्यांच्याशी अकारण शिवीगाळ केली. त्यानंतर दोघांमध्ये वाद निर्माण झाला.
वाद वाढल्यानंतर आरोपीने अजाबराव झांबरे यांना लोटपाट करून काठीने पाठीवर, दंडावर, हाताच्या पंजावर, मनगटावर तसेच डाव्या पायावर मारहाण केली. या मारहाणीत ते जखमी झाले.
याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामेश्वर बोरसे करीत आहेत.
बरफगावात किरकोळ कारणावरून एकास मारहाण
0
9
4
8
2
6
Users Today : 66
Leave a comment