डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न’ राज्यस्तरीय पुरस्कार

KHOZ MASTER
3 Min Read

डोणगाव प्रतिनिधी :
येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला यावर्षीचा ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातून यंदा डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची निवड झाल्याने परिसरात आनंद व्यक्त होत आहे.
आरोग्य सेवा देणाऱ्या केंद्रांमधून प्रत्येक जिल्ह्यातून एका प्राथमिक आरोग्य केंद्राची निवड या पुरस्कारासाठी केली जाते. डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राशी सुमारे २७ खेडी संलग्न असून ग्रामीण भागातील नागरिकांना सातत्यपूर्ण आरोग्य सेवा पुरविण्याचे कार्य येथे केले जाते. परजिल्ह्यातील रुग्णही दररोज तपासणीसाठी येथे येत असल्याचे सांगितले जाते.
कुटुंब कल्याण शस्त्रक्रियांचे लक्षणीय प्रमाण, सेवा कार्यातील सातत्य आणि गुणवत्तेला दिले जाणारे प्राधान्य यामुळे या केंद्राची निवड झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
उत्कृष्ट सेवेची राज्यस्तरीय पावती
या निवडीबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राम गायकवाड व सर्व कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. ग्रामीण भागात प्रभावी व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्याच्या त्यांच्या कार्याची ही राज्यस्तरीय दखल मानली जात आहे.
तसेच केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राम गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांची ‘महाआरोग्य सन्मान’ पुरस्कारासाठीही निवड झाल्याची माहिती देण्यात आली. यासंदर्भातील अधिकृत पत्र आरोग्य सेवांच्या सहसंचालक डॉ. सरीता हजारे यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पाठविले आहे. प्रतिनिधी :
येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला यावर्षीचा ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातून यंदा डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची निवड झाल्याने परिसरात आनंद व्यक्त होत आहे.
आरोग्य सेवा देणाऱ्या केंद्रांमधून प्रत्येक जिल्ह्यातून एका प्राथमिक आरोग्य केंद्राची निवड या पुरस्कारासाठी केली जाते. डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राशी सुमारे २७ खेडी संलग्न असून ग्रामीण भागातील नागरिकांना सातत्यपूर्ण आरोग्य सेवा पुरविण्याचे कार्य येथे केले जाते. परजिल्ह्यातील रुग्णही दररोज तपासणीसाठी येथे येत असल्याचे सांगितले जाते.
कुटुंब कल्याण शस्त्रक्रियांचे लक्षणीय प्रमाण, सेवा कार्यातील सातत्य आणि गुणवत्तेला दिले जाणारे प्राधान्य यामुळे या केंद्राची निवड झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
उत्कृष्ट सेवेची राज्यस्तरीय पावती
या निवडीबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राम गायकवाड व सर्व कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. ग्रामीण भागात प्रभावी व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्याच्या त्यांच्या कार्याची ही राज्यस्तरीय दखल मानली जात आहे.
तसेच केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राम गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांची ‘महाआरोग्य सन्मान’ पुरस्कारासाठीही निवड झाल्याची माहिती देण्यात आली. यासंदर्भातील अधिकृत पत्र आरोग्य सेवांच्या सहसंचालक डॉ. सरीता हजारे यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पाठविले आहे.

0 9 4 8 2 6
Users Today : 66
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *