चिखली प्रतिनिधी :
चिखली काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील विविध ठिकाणी शिवरायांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची, दूरदृष्टीची आणि लोककल्याणकारी राज्यकारभाराची आठवण करून दिली. शिवरायांच्या विचारांचे पालन करून समाजहिताचे कार्य करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
या कार्यक्रमास तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामभाऊ जाधव, अतहरोधीन काझी, नगरसेवक प्रा. नीलेश गावंडे, आसिफ, गोपालदेव्हाडे, उबेद अली खान, गोकुळ शिंगणे, डॉ. अमोल लहाने, आनंद बोंद्रे, संतोष देशमुख, जक्का, रत्नदिप शिनगारे, प्रशांत भटकर, हाजी राठफ, प्रदीप पचेरवाल, युवक काँग्रेस शहराध्यक्ष जाकीर, अल्पसंख्याक शहराध्यक्ष खलील बागवान, विनोद बोर्डे, मिलिंद पालवे, आत्माराम देशमाने, बिदुसिंग इंगळे, भास्कर चांदोरे, बाळू साळोख, संजय गिरी, भिका शेटे, राहुल चवरे, आया खान, शहेबाज शेख, अवान जमदार, भारत मूलचंदानी, डॉ. रविंद्र कमळस्कर, अकील खान, सोहिल शेख, नीलेश मोहिते यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमामुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. जय शिवरायच्या घोषणांनी परिसर दुमदुमला.
चिखली काँग्रेस कमिटीचा शिवजयंती उत्सव उत्साहात
0
9
4
8
2
6
Users Today : 66
Leave a comment