मलकापूर प्रतिनिधी :
राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त जिजाऊ मॉर्निंग फिटनेस वॉक क्लबच्या वतीने २०२६ रोजी रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. हनुमान चौक, मलकापूर येथे दीपिका कृषी केंद्राच्या बाजूला हे शिबिर पार पडले.
सदर शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक शालेय विद्यार्थ्यांनीही सहभाग नोंदवून आपला रक्तगट तपासून घेतला. सामाजिक बांधिलकी जपत आरोग्याबाबत जनजागृती करण्याचा उद्देश या उपक्रमामागे असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या शिबिरास आमदार चैनसुख संचेती, शिवसेना (उबाठा) उपजिल्हा प्रमुख गजानन ठोसर, नगरसेविका उर्मिलाताई जाधव, स्वातीताई खर्चेचें यांनी भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी जिजाऊ मॉर्निंग फिटनेस वॉक क्लबचे अध्यक्ष अॅड. जी. डी. पाटील, सचिव विजय पळसकर, सार्वजनिक शिवजयंती अध्यक्ष शिवराज जाधव, नगर परिषद उपाध्यक्ष अनिल गांधी, संतोषराव रायपुरे, प्रमोद अवसरमोल, अजय जाधव, नगरसेवक राजू पाटील, योगेश येरलीकर, चंद्रशेखर तागडे, बाळासाहेब जोगदंड, शंकर श्वळे, बाळू साबळे, अतुल जगदाळे, संदीप जगदाळे, पंकज झनके, ज्येष्ठ पत्रकार श्रीकृष्ण भगत, पत्रकार नितीन भुजबळ, अजय काकडे, मुरली पिसे, बापू देशमुख तसेच फिटनेस क्लबच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
या सामाजिक उपक्रमामुळे परिसरात आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली असून नागरिकांनी आयोजकांचे अभिनंदन केले.
जिजाऊ मॉर्निंग फिटनेस वॉक क्लबतर्फे रक्तगट तपासणी शिबिर उत्साहात
0
9
4
8
2
6
Users Today : 66
Leave a comment