टाकरखेड हेलगा येथे भक्तिमय वातावरणात शिवजयंती साजरी

KHOZ MASTER
1 Min Read

उदयनगर प्रतिनिधी :
उदयनगरपासून जवळच असलेल्या टाकरखेड हेलगा येथे शिवजयंतीनिमित्त टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या अखंड घोषात स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात शिवप्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. त्यानंतर वारकरी भाविकांनी अभंग, भजन आणि हरिनामाचा गजर सादर करत परिसर भक्तिरसाने भारून टाकला. टाळ-मृदुंगाच्या तालावर घुमणाऱ्या हरिनामाच्या नादात उपस्थितांनी शिवरायांच्या पराक्रमाची तसेच त्यांच्या आदर्श राज्यकारभाराची आठवण काढली.
हा सोहळा शिवशंभो बहुउद्देशीय संस्था, रुद्र शंभो ढोल ताशा पथक यांच्या परिश्रमाने तसेच शिवस्मारक समितीच्या विविध उपक्रमांतर्गत उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमामुळे गावात भक्तिमय आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले होते.

0 9 4 8 2 6
Users Today : 66
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *