स्व. हभप बाबुरावजी येके सार्वजनिक वाचनालयात शिवजयंती उत्साहात

KHOZ MASTER
1 Min Read

शेंदुर्जन प्रतिनिधी :
शेंदुर्जनजवळील लिगा येथील स्व. हभप बाबुरावजी येके सार्वजनिक वाचनालयात स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राधाबाई मोतीराम चेके होत्या. शिवजयंतीनिमित्त आयोजित या सोहळ्यात सहकार विद्यामंदिर येथील विद्यार्थिनी संतोषी भारत चेके हिने शिवरायांच्या जीवनकार्यावर प्रभावी भाषण करत उपस्थितांची मने जिंकली. तिच्या ओजस्वी वक्तृत्वामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
कार्यक्रमाची सुरुवात शिवप्रतिमेच्या पूजनाने व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. उपस्थितांनी शिवरायांच्या पराक्रमाची, दूरदृष्टीची आणि लोककल्याणकारी राज्यकारभाराची आठवण करून दिली.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वाचनालयाचे अध्यक्ष संजय बाबुराव चेके आणि ग्रंथपाल उद्धव राजेश्वर चेके यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली

0 9 4 8 2 6
Users Today : 66
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *