जनता विद्यालय, पिंपळगाव सराई येथे शिवजयंती उत्साहात

KHOZ MASTER
1 Min Read

सैलानी प्रतिनिधी :
पिंपळगाव सराई येथील जनता विद्यालयात स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद ठोंबरे होते. विद्यालयाचे पर्यवेक्षक संजय पिवटे व कला शिक्षक रवींद्र खानंदे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते, तर पत्रकार विठ्ठल सोनुने यांची विशेष उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात शिवरायांच्या प्रतिमेच्या पूजनाने व आरतीने करण्यात आली. इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी सरला पवार व स्नेहल गवते या माँ जिजाऊंच्या वेशभूषेत मंचावर उपस्थित राहिल्याने कार्यक्रमाला ऐतिहासिक व प्रेरणादायी स्वरूप लाभले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी शिवकालीन पोवाडे, देशभक्तीपर गीते तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक गजानन पाटोळे यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी तसेच कर्मचारी बंधू-भगिनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. संपूर्ण परिसर ‘जय शिवराय’च्या घोषणांनी दुमदुमला.

0 9 4 8 2 6
Users Today : 66
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *