धामणगाव (धाड) येथे शिवजयंती जल्लोषात साजरी

KHOZ MASTER
1 Min Read

धामणगाव प्रतिनिधी :
बुलढाणा तालुक्यातील धामणगाव येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बसस्थानक परिसर १९ फेब्रुवारी रोजी सकाळी स्वच्छ करून तरुणांनी सडा-सारवण करत आकर्षक रांगोळी काढून परिसर सुशोभित केला. भगवे झेंडे व पताकांनी संपूर्ण परिसर भगवामय झाला होता. ग्रामपंचायत कार्यालयाजवळ शिवरायांची प्रतिमा ठेवून पूजन व आरती प्रदीप टाकसाळ यांच्या हस्ते करण्यात आली.
शिवालय संस्थान उत्सव समितीच्या वतीने सायंकाळी ७ वाजता महादेव मंदिरापासून सजवलेल्या घोडा-रथातून शिवरायांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. पारथ ते धामणगाव जि.प. शाळेच्या पाठीमागून मासरूळ-धामणगाव मार्गे संपूर्ण गावातून मिरवणूक फिरवण्यात आली. जय शिवरायच्या घोषणांनी गाव दुमदुमले.
या कार्यक्रमास प्रदीप टाकसाळ, गोपाल देवकर, किशोर आहेर, शिवहरी पायघन, सतीश जंजाळ, देवेंद्र पायघन, ज्ञानेश्वर काळे, विकास राजपूत, भीमराव पायघन, दिनेश भुते, कडुबा काळे, विष्णू देवकर, विशाल पवार आदी उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान धाड ठाणेदार प्रताप भोस यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. प्रल्हाद शेजोळ व होमगार्ड देवानंद शिंदे यांनी बंदोबस्त ठेवून कार्यक्रम सुरळीत पार पडला

0 9 4 8 2 6
Users Today : 66
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *