मासरूळ प्रतिनिधी :
धाड येथील ज्ञानदेवराव बापू यांडगे विद्यालयात स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मनोज यांडगे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना शिवरायांच्या आदर्शांचा अंगीकार करण्याचे मार्गदर्शन केले. व्यासपीठावर मुख्याध्यापक संतोष डवले, उपप्राचार्य अमोल जाचव, प्रविण चव्हाण, विभाग प्रमुख प्रणाली बोर्डे व उषा शिदे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी आयोजित वेशभूषा स्पर्धेत नर्सरी ते केजी-२ तसेच प्राथमिक गटातील विद्यार्थ्यांनी ‘बालशिवाजी’ आणि ‘मावळे’ यांची रूपे साकारली. भगवे फेटे आणि हातात तलवार घेतलेल्या या चिमुकल्या शिवभक्तांमुळे विद्यालय परिसर शिवकालीन वातावरणाने भारावून गेला होता.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वक्तृत्व, चित्रकला तसेच इतर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी शिवचरित्राविषयीची आपली ओळख आणि अभिमान प्रभावीपणे व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकवृंद, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण विद्यालय परिसर ‘जय शिवराय’च्या घोषणांनी दुमदुमून गेला.
ज्ञानदेवराव बापू यांडगे विद्यालयात शिवजयंती उत्साहात
0
9
4
8
2
6
Users Today : 66
Leave a comment