मंगरुळ नवघरे येथे होमगार्ड सैनिकांकडून शिवजयंती जल्लोषात

KHOZ MASTER
1 Min Read

मंगरुळ नवघरे प्रतिनिधी :
येथे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त चिखली तालुका होमगार्ड सैनिकांच्या वतीने शिवजयंती उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात महाराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून करण्यात आली. यावेळी तालुका समादेशक शिवसिंग राजपूत यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
आपल्या मनोगतात त्यांनी शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेतील पराक्रम, दूरदृष्टी आणि संघटन कौशल्याचा उल्लेख केला. तरुणांनी शौर्य, धैर्य आणि देशसेवेची प्रेरणा घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच स्वराज्याच्या विचारांचा जागर करून समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमामुळे परिसरात देशभक्तीपूर्ण व प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले होते. उपस्थितांनी ‘जय शिवराय’च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून सोहळ्याची सांगता केली.

0 9 4 8 2 6
Users Today : 66
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *