डोणगाव येथे शिवजयंती जल्लोषात साजरी

KHOZ MASTER
1 Min Read

डोणगाव प्रतिनिधी :
१९ फेब्रुवारी रोजी डोणगाव येथे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती, डोणगाव यांच्या वतीने स्थानिक आठवडी बाजार परिसरात सकाळी ९ वाजता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विविध मान्यवरांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर प्रभात फेरी मार्गाने संपूर्ण गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणुकीचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. माजी सभापती निंबाजी पांडव, अर्जुनराव बाजड व दीपक गायकवाड यांनी स्थानिक वावटी चौकात शिवाजी महाराजांचे पूजन करून मिरवणुकीचे स्वागत केले. गावातील विविध ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते पुष्पवृष्टी व पूजन करून शिवरायांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान डोणगाव ठाणेदार अमरनाथ नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता समिती व पोलिस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. ‘जय शिवराय’च्या घोषणांनी गाव दुमदुमून गेला आणि शिवजयंतीचा सोहळा उत्साहात पार पडला.

0 9 4 8 2 6
Users Today : 66
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *