मेहकर प्रतिनिधी :
मेहकर शहरातील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात आज जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी भेट घेतली. नागरिकांच्या अडचणी, तक्रारी तसेच स्थानिक स्तरावरील विविध प्रश्न ऐकून घेत संबंधित विभागांमार्फत त्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
जनतेच्या प्रश्नांवर संवेदनशीलतेने आणि तत्परतेने प्रतिसाद देणे हीच खरी लोकसेवा आहे, या भावनेतून नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या समजून घेण्याचा आणि त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी जनतेच्या समस्या मार्गी लावण्यासाठी सदैव कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
“जनतेचा विश्वास आणि सहकार्य हीच आमची खरी ताकद,” अशी भावना उपस्थितांकडून व्यक्त झाली.
नागरिकांच्या समस्यांचे निरसन करण्यास कटिबद्ध
0
9
4
6
8
7
Users Today : 37
Leave a comment