हिवरा आश्रम येथे शिवजयंती उत्साहात

KHOZ MASTER
1 Min Read

हिवरा आश्रम प्रतिनिधी :
मेहकर मतदारसंघातील हिवरा आश्रम येथे अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळ्यास भेट देऊन महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित शिवप्रेमींसमवेत महाराजांच्या पराक्रम, दूरदृष्टी आणि लोककल्याणकारी राज्यकारभाराचे स्मरण करत स्वराज्याच्या विचारांना अधिक दृढ करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. समस्त नागरिकांना शिवजयंती उत्सवाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमास शिवसेना, युवासेना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक बांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवमय वातावरणात ‘जय शिवराय’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

0 9 4 8 2 6
Users Today : 66
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *