पायाभूत सुविधांचा शाश्वत विकास हेच ध्येय

KHOZ MASTER
1 Min Read

चिखली प्रतिनिधी :
चिखली मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचे दळणवळण अधिक सुलभ व्हावे या उद्देशाने आज सुमारे ४ कोटी रुपयांच्या विकासकामांचा भव्य भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.
मंजूर विकासकामे:
* मौजे भडगाव – भडगाव ते चांडोळ रस्ता
किंमत : १.५० कोटी रुपये
* मौजे मासरुळ – मासरुळ ते धामणगाव रस्त्यांचे काँक्रीटीकरण
किंमत : १.५० कोटी रुपये
* मौजे करडी – जोडरस्त्याचे भूमिपूजन
किंमत : ५० लाख रुपये
* मौजे म्हसला खुर्द – म्हसला खुर्द ते चांडोळ रस्ता
किंमत : ५० लाख रुपये
या विकासकामांमुळे नागरिकांना सुरक्षित, सुकर व जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. ग्रामीण भागातील शेती, शिक्षण, आरोग्य व व्यापार क्षेत्राला यामुळे मोठी चालना मिळेल. पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणातून मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग अधिक भक्कम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
यावेळी सर्वश्री देविदास पाटील जाधव (जिल्हा उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी), अनिल जाधव (मंडळ अध्यक्ष), डॉ. तेजराव नरवाडे (जिल्हा उपाध्यक्ष, भाजप), विष्णू पाटील वाघ, सुनील देशमुख, विशाल विसपुते, गजानन देशमुख, गणेश बाजी, विष्णू पाटील उगले, प्रवीण वाघ, मंगेश जाधव, दिगंबर जाधव यांसह महायुतीचे आजी-माजी पदाधिकारी, बूथप्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“विकास हीच खरी सेवा” या भूमिकेतून मतदारसंघाच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

0 9 4 8 2 6
Users Today : 66
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *