चिखली प्रतिनिधी :
महाराष्ट्र व अखंड हिंदुस्तानचे भूषण राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती, चिखली शहर तर्फे आयोजित भव्य महिला बाईक रॅली चिखलीत पार पडली.
या रॅलीत मोठ्या संख्येने चिखलीकर माता भगिनी मोठ्या उत्साहात सहभागी झाल्या. त्यांनी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंदन केले आणि उत्साही घोषणांनी रस्ते गजरले.
कार्यक्रमाचा उद्देश शिवरायांच्या पराक्रमाची आठवण, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक सहभागाला प्रोत्साहन देणे हा होता. रॅलीने शहरात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण केले आणि सहभागी महिला नागरिकांना प्रेरणादायी अनुभव दिला
जयंती आपल्या महाराजांची – चिखलीत भव्य महिला बाईक रॅली
0
9
4
8
2
6
Users Today : 66
Leave a comment