मोताळा प्रतिनिधी :
मोताळा तालुक्यातील ज्या ५२ ग्रामपंचायतींची कार्यकाळ जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत संपत आहे, त्यांच्यासाठी प्रशासनाने प्रभाग रचना कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर केला आहे.
प्रशासनाचे आवाहन
नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा.
प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी सविस्तर वेळापत्रक निश्चित केले आहे.
ग्रामस्तरावरील सूचना फलक आणि स्थानिक माध्यमांतून माहिती देण्यात येणार आहे.
प्रभाग रचनेचे टप्पे
२० फेब्रुवारी २०२६ – गुगल अर्थ नकाशे सुपर इम्पोज करून गावनिहाय नकाशे अंतिम करणे
२७ फेब्रुवारी २०२६ – तलाठी व ग्रामसेवक यांच्यामार्फत संयुक्त स्थळ पाहणी व सीमा निश्चिती
५ मार्च २०२६ – तहसीलदार, गट विकास अधिकारी व मंडळ अधिकारी यांच्या समितीकडून प्रारूप तपासणी
११ ते २३ मार्च २०२६ – जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करणे आणि राज्य हरकतींसाठी एप्रिलमध्ये संधी मिळणे
३० मार्च २०२६ – समितीद्वारे दुरुस्त्यांसह प्रारूप प्रभाग रचना मान्य करणे
नागरिकांसाठी हरकती व सूचना
७ एप्रिल २०२६ – नमुना-ब मध्ये प्रारूप प्रभाग रचनेची प्रसिद्धी
१३ एप्रिल २०२६ – हरकती व सूचना सादर करण्याची अंतिम मुदत
२१ एप्रिल २०२६ – प्राप्त हरकतींवर सुनावणी पूर्ण करणे
२८ एप्रिल २०२६ – जिल्हाधिकाऱ्यांकडून अंतिम प्रभाग रचना निश्चिती
४ मे २०२६ – अंतिम प्रभाग रचनेची नमुना-अ मध्ये अधिकृत प्रसिद्धी
समाविष्ट प्रमुख गावे
आडविहीर, वरूड, शेलापूर, घुस्सर बुद्रुक, माकोडी, उन्हा, आव्हा, टेंभी, टाकळी घडेकर, तळणी, दाभाडी, सावरगाव जहाँगीर, लिहा बुद्रुक, कोल्ही, पोफळी, सारोळा मारोती, सारोळापीर, काबरखेड, वडगाव खंडेराव, पुन्हई, धामणगाव बढे, सिंदखेड, रिधोरा, पिंपळगाव देवी, रोहिणखेड, कोथळी, जयपूर, बोराखेडी, परडा, तरोडा, अंत्री, मुर्ती, पान्हेरा, किन्होळा, तपोवन, दाभा, उबाळखेड, खामखेड, मोहेगाव आणि इतर गावांचा समावेश आहे.
नागरिकांनी नकाशे आणि प्रभाग सीमांची नीट पाहणी करून, काही हरकती असल्यास त्या विहित मुदतीत प्रशासनाकडे सादर कराव्यात, असे तहसीलदारांनी आवाहन केले आहे
मोताळा तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर
0
9
4
8
2
6
Users Today : 66
Leave a comment