खामगाव प्रतिनिधी :
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य, पराक्रम व दूरदृष्टी आजही प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी आहे. शिवरायांनी स्वराज्य स्थापताना समाजातील सर्व घटकांना सोबत घेतले. आजच्या युवकांनी त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेत निर्व्यसनी राहून समाजहितासाठी स्वतःला वाहून घेण्याचा संकल्प करावा, असे प्रतिपादन माजी आमदार Dilipkumar Sananda यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समिती व जगदंबा क्रीडा मंडळ, बाळापुर फैल यांच्या वतीने शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. दोन दिवस विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी परिसर दुमदुमून गेला.
कार्यक्रमाची वैशिष्ट्ये
१९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी महिला भगिनींच्या उपस्थितीत पारंपरिक पाळणा सोहळा
टाळ-मृदुंगाच्या गजरात बाळापुर फैल भागातून भव्य पालखी सोहळा
संपूर्ण परिसर भगवामय वातावरणात न्हाऊन निघाला
या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, तालुकाध्यक्ष मनोज वानखडे, शहराध्यक्षा सरस्वती खासणे, खामगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष किशोर भोसले, शिवसेना (शिंदे गट) तालुकाध्यक्ष राजेंद्र बघे, अमोल अंधारे, चेतन ठोंबरे, भाऊ बिडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून शिवरायांना अभिवादन केले. उत्सवामुळे परिसरात उत्साहाचे व भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
छत्रपतींचे शौर्य, पराक्रम व दूरदृष्टी प्रेरणादायी : सानंदा
0
9
4
8
1
9
Users Today : 59
Leave a comment