समर्थ फार्मसीच्या प्रा. मीनाक्षी चित्ते यांना आचार्य पदवी प्रदान

KHOZ MASTER
2 Min Read

देऊळगाव राजा प्रतिनिधी :
Samarth College of Pharmacy येथे फार्मासिटिकल केमिस्ट्री विभागातील प्रा. मीनाक्षी देवकर चित्ते यांना JJT University (राजस्थान) विद्यापीठाकडून फार्मासिटिकल सायन्सेस क्षेत्रातील उल्लेखनीय संशोधन कार्याबद्दल आचार्य (Ph.D.) पदवी प्रदान करण्यात आली आहे.
संशोधनाचा विषय
प्रा. चित्ते यांनी “Development and Evaluation of Polyherbal Formulation for Neurological Disorder” या विषयावर संशोधन केले. हे संशोधन समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीच्या रिसर्च सेंटरमध्ये पूर्ण करण्यात आले.
त्यांच्या संशोधनासाठी मार्गदर्शक म्हणून डॉ. अंकित सिंग व प्रा. डॉ. दिनेश घुबे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रफुल्ल ताठे व उपप्राचार्य डॉ. गोपालकृष्ण सीताफळे यांचे सहकार्य लाभले.
संशोधनाची वैशिष्ट्ये
न्यूरोलॉजिकल विकारांवर प्रभावी उपचार शोधण्याचा प्रयत्न
विविध औषधी वनस्पतींच्या संयोजनातून पॉलीहर्बल फॉर्मुलेशन विकसित
प्रयोगशाळा स्तरावर सखोल मूल्यमापन
विकसित संयोगाचे न्यूरोप्रोटेक्टिव्ह व अँटिऑक्सिडंट गुणधर्म प्रभावी असल्याचे निष्पन्न
अल्झायमर, पार्किन्सन्स, एपिलेप्सी व डिप्रेशन यांसारख्या विकारांवर सुरक्षित व परिणामकारक उपचार पद्धती विकसित करण्याच्या दृष्टीने हे संशोधन महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा नंदाताई कायंदे, सचिव सतीश कायंदे, सहसचिव आ. मनोज कायंदे, प्राचार्य डॉ. प्रफुल्ल ताठे, उपप्राचार्य डॉ. गोपालकृष्ण सीताफळे, फार्मासिटिकल केमिस्ट्री विभागप्रमुख प्रा. डॉ. पुरुषोत्तम लड्डा, फार्माकोलॉजी विभागप्रमुख प्रा. डॉ. दिनेश घुबे, फार्मासुटिक्स विभागप्रमुख प्रा. किशोर चहाटे तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
ही कामगिरी देऊळगाव राजा व परिसरासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.

0 9 4 8 1 9
Users Today : 59
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *