डोणगाव प्रतिनिधी :
डोणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरा देशमुख येथे घरफोडीची घटना उघडकीस आली असून घरातील कपाटातून रोख १ लाख ४० हजार रुपये चोरीस गेल्याचे समोर आले आहे.
ही घटना १९ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीदरम्यान घडली. अशोकराव केशवराव देशमुख (वय ६९) हे लघुशंकेसाठी उठले असता घरातील कपाट उघडे दिसले. त्यांनी तत्काळ पत्नी व सुनेला उठवून पाहणी केली असता कपाटातील रोख रक्कम गायब असल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणी गावातीलच सिध्दार्थ भीमराव वानखेडे याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला असून त्याविरोधात तक्रार देण्यात आली आहे. २० फेब्रुवारी रोजी पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास गावडे यांनी संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस कर्मचारी संजय धिके करीत आहेत. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असून गावात या घटनेमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
उमरा देशमुख येथे १.४० लाखांची घरफोडी
0
9
3
3
2
1
Users Today : 10
Leave a comment