२२ फेब्रुवारीला राज्यभर दुर्ग संवर्धन अभियान

KHOZ MASTER
1 Min Read

सिंदखेड राजा प्रतिनिधी :
Swami Samarth Seva va Adhyatmik Vikas Marg (दिंडोरी प्रणित) यांच्या वतीने २२ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांवर दुर्ग संवर्धन अभियान राबविण्यात येणार आहे. राज्याच्या ऐतिहासिक वारशाचे जतन आणि पर्यावरण संवर्धन या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
अभियानातील प्रमुख उपक्रम
किल्ल्यांवरील देवस्थान, प्रवेशद्वार, मंदिर परिसर व ऐतिहासिक वास्तू परिसरातील कचरा संकलन
पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता
पक्ष्यांसाठी पाण्याची व धान्याची व्यवस्था
जैवविविधतेची माहिती संकलन
महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांचे निरीक्षण
आयोजकांनी दुर्गप्रेमी, स्वयंसेवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. किल्ल्यावर जाण्यापूर्वी आवश्यक माहिती घेणे, स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधणे आणि ऐतिहासिक वास्तूंना कोणतीही हानी होणार नाही याची काळजी घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमातून स्वच्छता राखत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा मुख्य उद्देश असून, महाराष्ट्राच्या दुर्गवैभवाचे जतन करण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे

0 9 3 3 2 1
Users Today : 10
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *