हरभरा खरेदी केंद्र तत्काळ सुरू करण्याची मागणी

KHOZ MASTER
1 Min Read

चिखली प्रतिनिधी :
चिखली मतदारसंघात यंदा हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले असून शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी नाफेडअंतर्गत हरभरा खरेदी केंद्र तत्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी आमदार Shweta Mahale यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी पणन व वस्त्रोद्योग मंत्री Jai Kumar Rawal यांना लेखी पत्र पाठवून विनंती केली आहे. सध्या बाजारभावात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार होत असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
शासनाने हमीभावानुसार हरभरा खरेदीची सुविधा उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. चिखली मतदारसंघातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन संबंधित विभागाने तातडीने निर्णय घेऊन खरेदी केंद्र मंजूर करून सुरू करावे, अशी ठाम भूमिका आमदार महाले यांनी व्यक्त केली आहे.
या मागणीमुळे मतदारसंघातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आधार मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

0 9 3 3 2 1
Users Today : 10
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *