चिखला येथील महिलांवर हल्ला प्रकरणी तीव्र निषेध; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

KHOZ MASTER
1 Min Read

लोणार प्रतिनिधी :

तालुक्यातील चिखला येथे Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या पुतळ्याच्या वादातून महिलांना झालेली मारहाण अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोट लावणाऱ्या या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
स्वराज्य घडवणाऱ्या राजमाता Jijabai माँसाहेबांची जन्मभूमी असलेला आपला बुलढाणा जिल्हा ही अभिमानाची भूमी आहे. शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महिलांचा सन्मान जपणे हे आपले सामूहिक तसेच नैतिक कर्तव्य आहे.
या प्रकरणातील पीडित महिलांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करण्यात आली असून, घटनेशी संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची प्रशासनाकडे ठाम मागणी करण्यात आली आहे.
महिलांच्या सन्मानाशी तडजोड कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही.

0 9 4 8 1 9
Users Today : 59
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *