बुलढाणा प्रतिनिधी :
महामहीम राष्ट्रपती Droupadi Murmu यांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक आज शेंगाव शहरातील Hotel Sai Gajanan Inn येथे संपन्न झाली.
या बैठकीस आमदार Chainsukh Sancheti, माजी मंत्री आमदार Dr. Sanjay Kute, भाजपचे जिल्हाध्यक्ष मा.आ. Vijayraj Shinde यांची प्रमुख उपस्थिती होती.
भारत सरकारच्या Ministry of AYUSH यांच्या वतीने येत्या २५ ते २८ फेब्रुवारी दरम्यान शेंगाव येथे “राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावा २०२६” आयोजित करण्यात आला आहे. या भव्य आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते होणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन करण्याची जबाबदारी Akhil Bharatiya Ayurveda Mahasammelan या १९०७ साली त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र) येथे स्थापन झालेल्या देशातील सर्वात जुनी व मोठी आयुर्वेद संघटनेला देण्यात आली आहे. आयोजन समितीचे अध्यक्ष म्हणून आयुर्वेद महासंमेलनाचे उपाध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आयुर्वेद महासंमेलनाने यापूर्वी २२ राज्यस्तरीय तसेच ३ राष्ट्रीय स्तरावरील आरोग्य मेळावे यशस्वीपणे आयोजित केले आहेत.
या राष्ट्रीय मेळाव्याच्या माध्यमातून आयुष चिकित्सा पद्धती — आयुर्वेद, युनानी, सिद्धा, सोवा-रिग्पा, होमिओपॅथी, निसर्गोपचार आणि योग — यांचा प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे.
चार दिवस चालणाऱ्या या मेळाव्यात नागरिकांची व रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार तसेच तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात येणार आहे.
याशिवाय बुलढाणा जिल्हा व परिसरातील शेतकऱ्यांसाठी वन औषधी लागवड संदर्भात विशेष मार्गदर्शन करण्यात येणार असून, शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हा राष्ट्रीय स्तरावरील मेळावा शेंगाव शहरासाठी अभिमानाचा क्षण ठरणार आहे.
Users Today : 59