खंडणीच्या कारणावरून मारहाण, मंठा पोलिसात चार जणाविरुद्ध गुन्हा दाखल

KHOZ MASTER
1 Min Read

 

गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा

मंठा शहरातील छल्लानी कॉलनी येथे खंडणीच्या कारणावरून दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री सुमारे 9.30 वाजेच्या सुमारास घरात घुसून मारहाण व रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून नेल्या प्रकरणी मंठा पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी आशिषकुमार अरविंद चव्हाण (वय 42, व्यवसाय नोकरी, रा. छल्लानी कॉलनी, मंठा, जि. जालना) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार एकनाथ शिवशिंग चंदेल (वय 31, रा. तळणी, ता. मंठा), उस्मान आयुब खाँ पठाण (वय 32, रा. किर्ला, ता. मंठा) तसेच दोन अनोळखी इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार,संगनमत करून त्यांच्या घरी प्रवेश करून लोखंडी रॉडने फिर्यादीच्या उजव्या पायावर मारहाण करून जखमी केले. तसेच चाकूचा धाक दाखवत शिवीगाळ करून त्यांना खाली पाडले व सर्व आरोपींनी मिळून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादीच्या खिशातून जबरदस्तीने 11 हजार रुपये काढून घेतल्याचेही तक्रारीत नमूद आहे. शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचे फिर्यादीनत म्हटले आहे.
या प्रकरणी संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोजकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.मंगेश चौरे यांच्याकडे सोपविण्यात आला असुन अधिक तपास सुरू आहे.

0 9 4 8 1 9
Users Today : 59
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *