गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा
मंठा शहरात शिवजयंतीनिमित्त सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. सकाळपासूनच शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला फुलांच्या माळांनी सजविण्यात आले. तसेच परिसर आकर्षक विद्युत रोषणाई व भगव्या पताकांनी सजविण्यात आला होता.
जयंतीनिमित्त सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने सकाळी छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत दुचाकी फेरी व सायंकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला नगराध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक वैजनाथ बोराडे यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित तरुणांसह नागरिकांच्या जय भवानी , जय शिवराय च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
भगवे ध्वज व लहान मुला मुलींनी पारंपरिक वेशभूषा आणि घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवजयंती उत्सवाचा आनंद लुटला. जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अर्जुन बोराडे,उपाध्यक्ष भक्तीराम बोराडे, आकाश रिकामे, सचिव योगेश बोराडे,सहसचिव सुमित बोराडे, गोविंद बोराडे, मुकुंदा बोराडे दिगंबर बोराडे, गणेश बोराडे, अनंता बोराडे, सुदर्शन बोराडे यांच्यासह
जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रम शांततेत व उत्साहात पार पडला. यावेळी पोलीस निरीक्षक मनोजकुमार राठोड यांच्या पथकाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या शोभायात्रेत उपनगराध्यक्ष, नगरसेवक व राजकीय पदाधिकारी तसेच सर्व समाजातील बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थित होते
Users Today : 59