रिसोड, दि. २१ (प्रतिनिधी)
बांबूच्या बीजधारणेची घटना ही अत्यंत दुर्मिळ नैसर्गिक प्रक्रिया असून ती बांबूच्या जीवनचक्रातील अंतिम टप्पा दर्शविते, असे प्रतिपादन वृक्षमित्र गजानन मुलंगे यांनी केले. रिसोड येथील नामदेव गाडे यांच्या शेतामध्ये बीजधारी बांबूच्या बेटाचे निरीक्षण करताना ते बोलत होते.
बांबूची उंची, रंग-रूप, पोकळ किंवा भरीवपणा आदी गुणधर्मांनुसार जगभरात सुमारे १४० प्रजाती आढळतात. साधारणतः बांबूची रोप निर्मिती परिपक्व बांबूच्या पेरकांडाच्या जोडावर आलेल्या डोळ्यापासून केली जाते. मात्र काही विशिष्ट कालावधीनंतर—साधारणतः ५० ते १२० वर्षांदरम्यान—बांबूला फुले येऊन तपकिरी रंगाची, तांदुळाच्या आकाराची बियांची निर्मिती होते. हीच प्रक्रिया ‘बीजधारणा’ म्हणून ओळखली जाते.
मुलंगे यांनी सांगितले की, बीजधारणेनंतर बांबूचे संपूर्ण बेट वाळून जाते. त्यामुळे ही घटना घडते तेव्हा त्या बांबूच्या जीवनक्रमाचा शेवटचा टप्पा सुरू झालेला असतो. आदिवासी भागात या बियांना “बांस का चावल” असेही म्हटले जाते.
या बियांमध्ये फायबर, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट मुबलक प्रमाणात आढळतात. आयुर्वेदिक दृष्टीनेही त्यांना महत्त्व असून कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नगण्य असल्याने लठ्ठपणावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते, अशी माहिती त्यांनी दिली. बियांची निर्मिती दीर्घ कालावधीनंतर होत असल्याने बाजारात त्यांची उपलब्धता अत्यंत कमी असते
बांबू बीजधारणा ही दुर्मिळ नैसर्गिक घटना : वृक्षमित्र गजानन मुलंगे
0
9
4
8
0
7
Users Today : 47
Leave a comment