वारा जहागीर पायदळ दिंडीचे देपुळात उत्स्फूर्त स्वागत

KHOZ MASTER
1 Min Read

वाशीम, दि. २१ (प्रतिनिधी)
वाशीम येथून वारा जहागीर येथे जाणाऱ्या पायदळ दिंडीचे देपूळ येथे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. सतगुरू काकडशा बाबा व सतगुरू देवकर बाबा यांच्या दर्शनासाठी २० फेब्रुवारी रोजी ही पायदळ दिंडी आयोजित करण्यात आली होती.
देपूळ येथे दिंडीचे आगमन होताच रंगराव गंगावणे, बबनराव गंगावणे, विठ्ठलराव गंगावणे, महादेव वाघमारे, जी. आर. गंगावणे, एम. पी. गंगावणे, बबन आढाव आदींच्या पुढाकाराने ग्रामस्थांनी भाविकांचे स्वागत केले.
भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वारा जहागीर येथील सतगुरू काकडशा बाबा व सतगुरू देवकर बाबा यांच्या दर्शनासाठी मागील नऊ वर्षांपासून सुशील बेदरकर यांच्यासह बेदरकर परिवार तसेच डॉ. रत्नेश सुधाकर परळकर, डॉ. नेहा रत्नेश परळकर व शेकडो भाविक वाशीम ते वारा जहागीर अशी पायदळ वारी करीत आहेत.
या पायदळ पालखीचे सुपखेला, धानोरा मापारी व बोरी बु. येथेही स्वागत करण्यात आले. त्यानंतर वारा जहागीर येथे सकाळी सतगुरू काकडशा बाबा व सतगुरू देवकर बाबा यांना अभिषेक व आरती करण्यात आली. यावेळी महाप्रसादाचे वितरण करून धार्मिक वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

0 9 3 3 4 4
Users Today : 1
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *