अकोला, दि. २१ (प्रतिनिधी)
जिल्हा रेशीम कार्यालयातर्फे रेशीम रथाचा शुभारंभ जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्ह्यात सध्या सुमारे ५०० एकरावर तुतीची लागवड असून ज्या गावांमध्ये पूर्वीपासून तुतीची लागवड आहे तसेच लगतच्या गावांमध्ये नवीन तुती लागवडीसाठी या रथाद्वारे जनजागृती व प्रचार-प्रसिद्धी केली जाणार आहे.
अकोला जिल्ह्यासाठी नवीन तुती लागवडीचा एकूण ६०० एकर लक्षांक देण्यात आला असून त्यामध्ये रेशीम विभागासाठी २०० एकर, कृषी विभागासाठी २०० एकर व पंचायत विभागासाठी २०० एकर असा समावेश आहे.
अल्पभूधारक शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत १ एकर क्षेत्रासाठी तीन वर्षांत ४ लाख ३२ हजार २४० रुपये मजुरी व साहित्यासाठी दिले जातात. बहुभूधारक शेतकऱ्यांसाठी केंद्र पुरस्कृत ‘सिल्क समग्र-२’ योजनेतून १ एकर तुती लागवडीसाठी ४५ हजार रुपये, ठिबक सिंचनासाठी ४५ हजार रुपये, रेशीम कीटक संगोपन गृह बांधकामासाठी २ लाख ४३ हजार ७५० रुपये, कीटक संगोपन साहित्य खरेदीसाठी ३७ हजार ५०० रुपये व निर्जंतुकीकरण औषधांसाठी ३ हजार ७५० रुपये असे एकूण सुमारे ३ लाख ७५ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते.
जिल्ह्यात तुती लागवडीखालील क्षेत्र वाढत असून कोश विक्रीसाठी बडनेरा, जालना व बीड येथे रेशीम कोष बाजार सुरू करण्यात आले आहेत. सध्या कोशाचा दर सुमारे ७५० रुपये प्रति किलो असून दुसऱ्या वर्षापासून प्रति एकरी दोन ते अडीच लाख रुपये उत्पादन शेतकऱ्यांना मिळत आहे.
जिल्हा रेशीम कार्यालय अकोला तर्फे ‘रेशीम रथ’चा शुभारंभ
0
9
3
3
4
4
Users Today : 1
Leave a comment