अकोला, दि. २१ (प्रतिनिधी)
स्थानिक श्री राम उत्सव समिती २०२६ ची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून समितीच्या बैठकीत सर्वानुमते विक्रांत देशमुख यांची कार्याध्यक्षपदी तर संतोष हेडा यांची स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आली. उद्योजक नितीन खंडेलवाल यांच्या निवासस्थानी आयोजित बैठकीत शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
समितीच्या माध्यमातून विविध उपसमित्या गठीत करण्यात येणार असून यंदा रामनवमी निमित्त पंचदिवसीय उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवात मातृशक्तीचा विशेष सहभाग राहणार असल्याची माहिती देण्यात आली. महिलांच्या नियोजनशक्ती, समन्वय आणि श्रद्धेमुळे श्रीराम उत्सव अधिक आकर्षक, सुसंस्कृत व भक्तिमय होतो, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
यंदाच्या उत्सवात महिलांना विशेष प्राधान्य देण्यात येणार असून त्यांच्या सहभागातून समाजात सकारात्मक ऊर्जा आणि धार्मिक एकात्मता वाढीस लागेल, असेही नमूद करण्यात आले. सर्व महिला मंडळे, माता-भगिनी व युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रामभक्तीचा संदेश समाजात पोहोचवावा, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले.
बैठकीस नितीन खंडेलवाल, अॅड. मोतीसिंग मोहता, बनवारी बजाज, कमल अग्रवाल, डॉ. अभय जैन, सुनील इनानी, अभय बिजवे, विजय तिवारी, अशोक शर्मा, राधेश्याम शर्मा, प्रकाश घोगलिया, बबलू सोनालावाले, बंटी कागलीवाल, भारत मिश्रा, पंकज कागलीवाल, पवन पाडिया, सूरज भगेवर, राजू बालाजी, हरिओम पांडे, संजय अ. शर्मा, हभप तुलसीदास मसने महाराज, पं. श्रीकांत शर्मा, सुनील करनानी, श्याम पचौरी, शशांक जोशी, प्रकाश शर्मा तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
श्री राम उत्सव समिती ची धुरा विक्रांत देशमुख व संतोष हेडा यांच्या खांद्यावर
0
9
3
3
4
4
Users Today : 1
Leave a comment