खेट्री, दि. २१ (प्रतिनिधी)
पातुर तालुक्यातील उमरा येथे १२ क्विंटल तांदूळ साठा जप्त केल्याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चांदणी पोलीस ठाणे येथे १९ फेब्रुवारी रोजी हा गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
पातूरचे तहसीलदार राहुल वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा निरीक्षण अधिकारी शितल मोरखडे यांनी १७ फेब्रुवारी रोजी दुपारी उमरा येथे कारवाई केली होती. गणपती मंदिर परिसरातील मोकळ्या जागेत तांदळाचा संशयास्पद साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुरवठा विभागाने घटनास्थळी पाहणी केली.
अधिकाऱ्यांची उपस्थिती लक्षात येताच तेथे असलेले काहीजण घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती आहे. तपासणीदरम्यान सदर तांदूळ साठा विनामालकीचा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर १२ क्विंटल तांदूळ जप्त करण्यात आला. जप्त केलेला तांदूळ पातूर येथील शासकीय धान्य गोदामात जमा करण्यात आला आहे.
तांदूळ साठा जप्तप्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा
0
9
3
3
4
4
Users Today : 1
Leave a comment