दहावीच्या परीक्षेत बापलेक एकाच केंद्रावर परीक्षार्थी

KHOZ MASTER
1 Min Read

अकोट, दि. २१ (प्रतिनिधी)
“शिकण्याला वयाची मर्यादा नसते” याची प्रचिती अकोट शहरात पाहायला मिळाली. दहावीच्या परीक्षेला सुरुवात होताच भाऊसाहेब पोटे विद्यालय या परीक्षा केंद्रावर एक अनोखा प्रसंग घडला. वडील आणि मुलगा दोघेही यंदा दहावीची परीक्षा देत असल्याची माहिती समोर आली.
विशेष म्हणजे या बापलेकांचे आसन क्रमांक एकामागोमाग एक आल्याने परीक्षा केंद्रावर उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले होते. पहिल्या दिवशी मराठी विषयाचा पेपर पार पडला. मात्र मुलगा परीक्षेला उपस्थित राहिला असताना वडील गैरहजर राहिल्याचे दिसून आले.
तालुक्यात शुक्रवारपासून दहावीची परीक्षा सुरू झाली असून १५ परीक्षा केंद्रांवर सुमारे ३५०० विद्यार्थी परीक्षा देत आहेत. पहिल्या दिवशीचा मराठी विषयाचा पेपर शांततेत पार पडला. संबंधित विद्यार्थ्याच्या वडिलांना परीक्षा देण्यासाठी त्यांच्या मित्रांनी केंद्रावर येऊन प्रोत्साहन दिल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
या अनोख्या योगायोगामुळे काही काळ परीक्षा केंद्रावर चर्चेला उधाण आले होते. दरम्यान, तालुक्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरळीत व शांत वातावरणात पार पडत असून कोणताही अनुचित प्रकार घडल्याची नोंद नाही. आपल्या पाल्यांना परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी पालकांची मोठी गर्दी दिसून आली. प्रशासनाकडून परीक्षा सुरळीत सुरू असल्याचे सांगण्यात आले.

0 9 3 3 4 4
Users Today : 1
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *