आदर्श विद्यालयाला मूल्यांकन अंतर्गत ‘ए’ प्लस दर्जा

KHOZ MASTER
1 Min Read

चिखली, दि. २१ (प्रतिनिधी) :

महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार शाळांची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी नेमलेल्या समितीद्वारे झालेल्या बाह्य मूल्यांकनात आदर्श विद्यालय चिखली या विद्यालयाला ‘ए’ प्लस दर्जा प्राप्त झाला आहे. हे विद्यालय शिक्षण प्रसारक मंडळ चिखली द्वारा संचालित आहे.
शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAAF) अंतर्गत प्रथम शाळास्तरावर अंतर्गत मूल्यांकन करण्यात आले. त्यानंतर जिल्हास्तरीय समितीने भेट देऊन पडताळणी केली. या प्रक्रियेनंतर बुलढाणा जिल्ह्यातून दोन विद्यालये व एका महाविद्यालयाची निवड करण्यात आली असून त्यामध्ये आदर्श विद्यालयाचा समावेश आहे.
गतवर्षी ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमांतर्गतही विद्यालयाला जिल्ह्यातून द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, शैक्षणिक संकुलातील भौतिक सुविधा, गुणवत्ता वृद्धी आणि सातत्यपूर्ण प्रगती या निकषांवर सहा क्षेत्रांमध्ये मूल्यांकन करण्यात आले.
जिल्ह्यातील सर्वाधिक विद्यार्थीसंख्या असलेल्या या विद्यालयात विविध उपक्रम योजनाबद्ध पद्धतीने राबवले जातात. संस्थेचे अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे, सचिव प्रेमराज भाला व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालय सातत्याने प्रगतीपथावर आहे. हा बहुमान मिळविण्यात प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभल्याची भावना व्यक्त करण्यात आली

0 9 3 3 4 4
Users Today : 1
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *