सिंदखेड राजा :
सिंदखेड राजा तालुक्या++-000000000000000000.
तील सावखेड तेजन येथील एका गर्भवती महिलेची १०८ रुग्णवाहिकेमध्ये सुखरूप प्रसूती झाल्याने रुग्णवाहिका कर्मचारी व वैद्यकीय पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
२० फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे १०.३० वाजता सावखेड तेजन येथून संबंधित महिलेला तीव्र प्रसूती वेदना होत असल्याचा फोन १०८ रुग्णवाहिका सेवेला प्राप्त झाला. त्यानंतर कर्तव्यावर असलेले डॉ. उज्वलकुमार तायडे आणि रुग्णवाहिका चालक विलास केकान यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
रुग्णाची प्रकृती गंभीर असून प्रसूती वेदना तीव्र असल्याचे लक्षात येताच डॉ. तायडे व चालक विलास केकान यांनी रुग्णवाहिकेमध्येच प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. रुग्णवाहिकेत उपलब्ध असलेल्या डिलिव्हरी किटचा वापर करून महिलेची सुरक्षितरित्या प्रसूती करण्यात आली.
यानंतर आई व बाळ दोघांनाही पुढील उपचारासाठी सुरक्षितपणे ग्रामीण रुग्णालय सिंदखेड राजा येथे दाखल करण्यात आले. वेळेवर दाखविलेल्या तत्परतेमुळे दोघांचेही प्राण वाचल्याने परिसरातून वैद्यकीय पथकाचे अभिनंदन करण्यात येत आहे.
Users Today : 1