रायपूर येथील कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये उत्साहात प्रवेश; विकासनीतीवर व्यक्त केला विश्वास

KHOZ MASTER
2 Min Read

चिखली प्रतिनिधी :

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांगीण विकासनीतीवर तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत रायपूर येथील असंख्य कार्यकर्त्यांनी चिखली येथे मोठ्या उत्साहात भारतीय जनता पक्ष मध्ये जाहीर पक्षप्रवेश केला.
माझ्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात विविध गावांतील कार्यकर्त्यांनी पक्षध्वज स्वीकारत भाजपाच्या विचारसरणीशी निष्ठा व्यक्त केली. केंद्र व राज्य सरकारच्या विकासाभिमुख धोरणांमुळे प्रेरित होऊन त्यांनी पक्षात प्रवेश केल्याचे सांगितले.
या पक्षप्रवेशामध्ये श्री. उमेश किसन काळे, श्री. अशोक विठोबा खिल्लारे, श्री. अमरदीप यशवंत खिल्लारे, श्री. सुखदेव नाथाजी खिल्लारे, श्री. प्रेमानंद तुकाराम सरकटे, श्री. चिंतामण रामजी लहाने, श्री. साहेबराव रामजी लहाने, श्री. रमेश तुकाराम सरकटे, श्री. रामदास सांडूजी खिल्लारे, श्री. प्रल्हाद सखाराम खिल्लारे, श्री. विजय शेषराव सोनुने, श्री. प्रभाकर राजूअप्पा देशमाने, श्रीमती मीना दिलीप लहाने, श्रीमती उषा प्रेमानंद सरकटे, श्रीमती छाया अशोक खिल्लारे, श्रीमती राखी सतीश झिने, श्रीमती पुष्पा मिलिंद खिल्लारे, श्रीमती मंदा राहुल लहाने, श्रीमती मंगला ज्ञानदेव खिल्लारे, श्रीमती कविता संजय नरवाडे, श्रीमती बेबी बबन साळवे, श्रीमती रमाबाई राजू मखरे, श्रीमती सुशिला दत्तू लहाने, श्रीमती मंदा सुखदेव खिल्लारे, श्रीमती लक्ष्मी लक्ष्मण खिल्लारे, श्रीमती नंदा साहेबराव लहाने, श्री. सचिनआप्पा अशोकआप्पा देशमाने, श्री. राजेंद्रसिंग युवराजसिंग देशमुख, श्री. शरद लोखंडे, श्री. शिवाजी भगवान मोसळे, श्री. श्रीकिसन गुलाबराव मोसळे, श्री. राहुल सुभाष सिरसाठ, श्री. मदन देविदास देशमाने व श्री. संदीप बाहेती यांचा समावेश आहे.
यावेळी डॉ. रामेश्वर उबरहंडे (जिल्हाध्यक्ष, भाजप वैद्यकीय आघाडी), शेख चाद मुजावर (पंचायत समिती सदस्य), शंकरराव तरमळे, किशोर साखरे (माजी पंचायत समिती सदस्य), किसन गंगाराम राऊत, आशिष कमलनारायण जैस्वाल, विलास आहेर, डॉ. शैलेश वाघ, राजू पा. चिकटे व दीपक साहेबराव गवते (पिंपळगाव सराई) उपस्थित होते.
चिखली येथे झालेला हा भव्य पक्षप्रवेश आगामी काळात संघटन अधिक बळकट करण्यास निश्चितच हातभार लावणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. सर्व नव्या सहकाऱ्यांचे भारतीय जनता पक्षात मनःपूर्वक स्वागत करण्यात आले.

0 9 4 8 0 7
Users Today : 47
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *