मोताळा तालुक्यात १.२४ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन; दाभा येथे ‘धर्मवीरनगर’ नामफलकाचे अनावरण

KHOZ MASTER
1 Min Read

मोताळा, दि. २२ (प्रतिनिधी):

बुलढाणा विधानसभा मतदारसंघ अंतर्गत मोताळा तालुक्यात विविध गावांमध्ये १ कोटी २४ लाख रुपये किमतीच्या विकासकामांचा भव्य भूमिपूजन व लोकार्पण सोहळा २२ फेब्रुवारी रोजी पार पडला. आमदार तथा शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख संजय गायकवाड यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना आ. गायकवाड यांनी ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. प्रत्येक गावात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हेच आपले ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केले.
दाभा येथे ‘धर्मवीरनगर’ नामफलकाचे अनावरण
कार्यक्रमादरम्यान दाभा येथे ‘धर्मवीरनगर’ या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. तसेच खामखेड येथे २० लाख रुपये किमतीच्या ‘मातोश्री’ ग्रामपंचायत भवनाचे लोकार्पण करण्यात आले. नव्या इमारतीमुळे ग्रामपंचायत प्रशासन अधिक सक्षम होणार असून ग्रामस्थांना विविध शासकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत.
रस्ता सुधारणा व पाटबंधारे कामांना गती
जिल्हा नियोजन योजनेंतर्गत गुळभेली ते दाभा या मार्गाच्या २५ लाख रुपये किमतीच्या रस्ता सुधारणा कामांचे भूमिपूजन करण्यात आले. या रस्त्यामुळे दळणवळण सुलभ होऊन शेतकऱ्यांच्या कृषीमाल वाहतुकीस मोठी मदत होणार आहे.
तसेच जिल्हा नियोजन अंतर्गत नळकुंड येथे ७९ लाख रुपये किमतीच्या पाटबंधारे प्रकल्पांतर्गत नाला खोलीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. या कामामुळे पाणी साठवण क्षमता वाढून शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिलासा मिळणार आहे

0 9 4 8 0 7
Users Today : 47
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *