निरोड शिवारात शेतकऱ्याचा मृतदेह आढळला; मृत्यूचे कारण अस्पष्ट

KHOZ MASTER
1 Min Read

संग्रामपूर (प्रतिनिधी):

तालुक्यातील निरोड शिवारात अंदाजे ७० वर्षीय शेतकरी गणेश नारायण ससाने यांचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
संग्रामपूर येथील रहिवासी असलेले गणेश ससाने यांचे शेत निरोड शिवारात असून ते नेहमीप्रमाणे सकाळी शेतात गेले होते. मात्र, सुमारे सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शेतात त्यांचा मृतदेह आढळून आला. वेळेवर घरी न परतल्याने नातेवाईकांनी शोध घेतला असता ही घटना उघडकीस आली.
नातेवाईकांनी तातडीने त्यांना संग्रामपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविले. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. पुढील तपासासाठी मृतदेह वरवट बकाल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
प्राथमिक माहितीनुसार मृताच्या पाठीमागे जखम आढळली असून विजेचा धक्का लागून पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तथापि, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले.

0 9 4 8 0 7
Users Today : 47
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *