मोताळा येथे छत्रपती शिवाजी महाराजांची ३९६ वी जयंती उत्साहात

KHOZ MASTER
1 Min Read

मोताळा (प्रतिनिधी):

सहकार स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती मोताळा येथे मोठ्या जल्लोषात व पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मर्दानी खेळ, लेझीम आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे रोहिणखेड येथील संभाजी हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शिव-शंभू मर्दानी आखाडा’च्या वतीने सादर करण्यात आलेले मर्दानी खेळ. लहान मुला-मुलींनी लाठी-काठी, दांडपट्टा आणि इतर साहसी प्रकारांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा पोवाडा खणखणीत आवाजात सादर केला. नर्सरी ते इयत्ता आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी शिवचरित्रातील विविध प्रसंगांवर आधारित संगीत नाटिका सादर करत शिवकालीन आठवणींना उजाळा दिला. इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेले शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण लेझीम प्रात्यक्षिक कार्यक्रमाची रंगत वाढवणारे ठरले.
यावेळी शाळेचे कला शिक्षक गजानन तळोले यांनी फळ्यावर रंगांच्या साहाय्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे जिवंत भासावे असे आकर्षक चित्र रेखाटून उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमास शिक्षक, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 9 4 8 0 7
Users Today : 47
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *