गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा
मंठा… महाराष्ट्र सरकारच्या अल्पसंख्यांक विभागामार्फत शिख धर्माचे नववे गुरु श्री तेगबहादूर साहिब जी यांच्या 350 व्या शहीदी समागम,नमना आणि राष्ट्रीय एकात्मता दृढ व्हावी या साठी दोन दिवसीय ऐतिहासिक कार्यक्रम 28 फेब्रुवारी व 01 मार्च रोजी ओवे मैदान,सेक्टर 29,खारघर,नवी मुंबई येथे सकाळी 8:00 ते रात्री 10:00 वाजे पर्यंत आयोजित करण्यात आलेला आहे.या कार्यक्रमाला भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे विकास प्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेआणि सुमित्रा पवार हे उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे मुख्य नियोजन रामेश्वर नाईक यांच्या अनुषंगाने होत आहे.या राष्ट्रीय एकतेच्या ऐतिहासिक नामनाच्या विविध राष्ट्रीय आणि सामाजिक उपक्रमाच्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त शिख,लमाण,बाजीगर, लामन,लम्बाडी, बामणिया,चारण,मथुरिया,धड़िया, नायक,गवारियाआणि बंजारा बंधू-भगिनींनी उपस्थित राहावे असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते अविनाश राठोड यांनी केले आहे
Users Today : 47