गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा
मंठा नगरपंचायत येथे सोमवार, दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी स्वीकृत सदस्यपदासाठी सतीश बोराडे व शरद मोरे यांनी आपले नामनिर्देशन अर्ज मुख्याधिकारी यांच्या हस्ते सादर केले. नियमित प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्वीकृत सदस्य म्हणून सतीश बोराडे व शरद मोरे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडीची अधिकृत घोषणा होताच नगरपंचायत पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.
नवनिर्वाचित सदस्यांच्या निवडीमुळे नगरपंचायतीच्या कामकाजात अधिक गती येईल
तसेच शहरातील प्रलंबित विकासकामांना चालना मिळेल, अशी अपेक्षा मंठा शहरातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
Users Today : 47