रेती तस्करांचा हैदोस ! किर्रला घाटावरून दिवसाढवळ्या अवैध रेती पुरवठा.. महसूल विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष…

KHOZ MASTER
3 Min Read

 

गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा
मंठा तालुक्यातील तळणी परिसरातून किर्रला गावातुण पुर्णा रेती घाटावरून मोठ्या प्रमाणावर दिवसा ढवळ्या रेती तस्करी सुरू असून मंठा तालुक्यातील रेती तस्करांचा अक्षरशः धुमाकूळ सुरू आहे. किर्रला गावातुन तीन ते चार टिप्पर दररोज अवैधरित्या रेती भरून बांधकाम करणाऱ्या घरबांधणी करणाऱ्यांना पुरवठा केला जात असल्याची गोपनीय माहिती समोर आली आहे. या कामासाठी नेमलेले पथक मात्र ‘तेराभी भला, मेरा भी भला’ या पद्धतीने वागत असल्याने तस्करी रोखण्याऐवजी ती अधिक वाढत असल्याची नागरिकांत चर्चा आहे.

 

तस्कर पुर्णा पात्रातुन जेसीबी व ट्रॅक्टरच्या साह्याने खुलेआम रेती उपसा करत असून, त्याच रेतीची आनेक टिप्पर धारकांना नियमित पुर-वठा होत असल्याचे उघड झाले आहे. या सर्व कारवाया रोखण्यासाठी नेमलेले पथक करण्याऐवजी आर्थिक व्यवहार रेती माफिया सोबत करतात हि चर्चा परिसरातून उमटत आहे

पथक कुचकामी, कारवाई करणार कोण?

रित्या उत्पन्न होणाऱ्या रेतीलाच अभय दिल्या जात असल्यामुळे सर्वत्र नाराजी पसरली आहे. अनेक टिप्पर चालक ‘आमचे काही बिघडत नाही’ या भावनेने दिवसाढवळ्या रेती तस्करी करत असून कोट्यवधींचा महसूल बुडवत आहेत. ‘या प्रकरणाची कोण तहसीलदारांना माहिती असूनही मांजराच्या गळ्याला घंटी बांधणार कोण?’ हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

करून तस्करांना अभय देत असल्याच्या स्वरूपाचा आरोप नागरिकांनी केला आहे.

या संपूर्ण व्यवहारामागे तहसीलदार , मंडळ अधिकारी, तलाठी व राजकीय वरदहस्त असल्याची शंका नागरिकांनी व्यक्त केली आहे. संबंधित विभागातील अधिकारी यांचे आश्रय तस्करांना मिळत असल्याची चर्चा अधिक तीव्र होत आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा का

रवाईपासून दूर राहात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मुजोर तस्करांवर कठोर कारवाई करण्यासाठी शासनाने राजकीय दबावाला जुमानू नये, अशी मागणी नागरिकांनी केली असून गरजू घरकुलधारकांत संताप वाढला आहे.

एकीकडे प्रधानमंत्री घरकुल योजनेत लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती मोफत देण्याची घोषणा शासनाने केली असली तरी रेती तस्करीमुळे ही घोषणा फसवी ठरत आहे. प्रत्यक्ष लाभाथ्यांना रेती मिळत नाही, तर तस्करांच्या खिस्यात कोट्यवधी जात आहेत. त्यामुळे महसूल मंत्र्यांनी तातडीने लक्ष घालून तहसीलदारांना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी गरजू आणि पात्र घरकुल धारकांकडून जोर धरत आहे.

तहसीलदार सुमन मोरे
मंडळ अधिकारी व तलाठी माहिती घेऊन जिथे रेतीचे उत्खनन झालेले आहे तेथिल संबंधितांवर बोजा टाकण्यात येणार आहे. मंडळ अधिकारी व तलाठी यांना कारवाई करण्यास सांगितले आहे तहसी सुमन मोरे.. मंठा तहसील कार्यालय

0 9 4 8 0 7
Users Today : 47
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *