चिखला येथील घटनेच्या निषेधार्थ डोणगाव बंदची हाक

KHOZ MASTER
1 Min Read

डोणगाव प्रतिनिधी :

बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुका अंतर्गत चिखला येथे शिवस्मारकावरून दोन गटांमध्ये झालेल्या वादातून महिलांवर अमानुष मारहाण झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेच्या निषेधार्थ सकल शिवप्रेमी समाज यांच्या वतीने २२ फेब्रुवारी रोजी डोणगाव शहर कडकडीत बंद ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे.
वादाचे हाणामारीत रूपांतर
२० फेब्रुवारी २०२६ रोजी चिखला येथे शिवस्मारकावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर या वादाचे तुंबळ हाणामारीत रूपांतर झाले. या घटनेत मराठा समाजातील शिवकन्या संजीवनीताई वाघ तसेच इतर महिलांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. महिलांच्या अंगावरील कपडे फाटेपर्यंत मारहाण झाल्याचे सांगण्यात येत असून, या प्रकारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कठोर कारवाईची मागणी
या घटनेचा निषेध करत मुख्य आरोपी व सहआरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोलिस प्रशासनामार्फत देण्यात आले आहे.
भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत आणि समाजात तणाव निर्माण होऊ नये, यासाठी कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
२२ फेब्रुवारीला डोणगाव बंद
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ २२ फेब्रुवारी रोजी डोणगाव शहर पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय सकल शिवप्रेमी समाजाने घेतला आहे. नागरिकांनी या बंदला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

0 9 4 8 0 7
Users Today : 47
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *