प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
भोकरदन!भारतीय बारी समाज नवनिर्माण संघटना यांच्या वतीने मराठवाडा विभाग अध्यक्षपदी श्री. सुनील रामचंद्र उंबरकर यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती संघटनेचे अध्यक्ष मनीष अस्वार यांच्या आदेशानुसार जाहीर करण्यात आली.
सुनील रामचंद्र उंबरकर हे समाजकार्यात सक्रिय असून संघटनात्मक बांधिलकी, नेतृत्वगुण आणि समाजाविषयी असलेली तळमळ लक्षात घेऊन त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा विभागात संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे राबविले जाईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
जालना जिल्हाध्यक्ष मा. महिंद्र बेराड सर यांनी त्यांचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच जाफराबाद तालुका अध्यक्ष राजेश दामधर सर यांनी अभिनंदन करत समाजहिताचे उपक्रम अधिक जोमाने राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली.
या नियुक्तीमुळे मराठवाडा विभागात संघटनेला नवे बळ मिळणार असून सामाजिक, शैक्षणिक व संघटनात्मक कार्याला गती मिळणार आहे.
Users Today : 9