मेहकर प्रतिनिधी :
जिल्हा परिषद मराठी केंद्रीय प्राथमिक शाळा, देऊळगाव माळी (ता. मेहकर) येथे दि. २१ फेब्रुवारी रोजी शालेय व्यवस्थापन समितीची निवडणूक शांततेच्या वातावरणात पार पडली.
मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी नियमांनुसार जातनिहाय आरक्षण काढले. त्यानंतर इयत्ता पहिली ते चौथीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. काही पदांवर मतदान प्रक्रियेद्वारे निवड झाली, तर काही सदस्य बिनविरोध निवडून आले.
निवडून आलेल्या सदस्यांनी आपल्यातून अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड मतदानाद्वारे केली. यात सौ. श्रद्धा राहुल मगर यांची अध्यक्षपदी तर संतोष मधुकर बळी यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
तसेच सुनील अशोक जाधव, सौ. दिपाली कैलास जाधव, सौ. वंदना दत्ता भराड, सौ. यमुना कैलास राऊत, प्रशांत भारत मगर, दत्ता सिताराम फलके यांची सदस्य म्हणून निवड झाली. यामध्ये एक ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक प्रतिनिधी, उच्चशिक्षित सदस्य तसेच बालविकास तज्ञ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.
उपाध्यक्ष पदाच्या निवडीदरम्यान काही काळ चर्चा रंगली होती. ओबीसी व अनुसूचित जाती (एससी) गटातील उमेदवार इच्छुक होते. अखेरीस मतदानाद्वारे ओबीसी गटातील उमेदवाराला बहुमत मिळाले.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सुयोग्य नियोजन करून निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडली.
Users Today : 9