प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत पैनगंगा नदी स्वच्छता अभियान;मेहकरात उत्स्फूर्त प्रतिसाद

KHOZ MASTER
2 Min Read

मेहकर प्रतिनिधी :

संत निरंकारी मिशनच्या सेवा भावना आणि मानवकल्याणाच्या संकल्पातून ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या उपक्रमाच्या तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ रविवार, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी दिल्ली येथील यमुना नदीच्या छठ घाटावर परम श्रद्धेय सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज आणि सत्कारयोग्य निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सान्निध्यात करण्यात आला. या उपक्रमांतर्गत मेहकर येथे पैनगंगा नदी व तिच्या काठाची स्वच्छता करण्यात आली.
जलसंवर्धनाचा व्यापक संदेश
संत निरंकारी मिशन ने बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या प्रेरणादायी शिकवणीला अनुसरून २०२३ मध्ये संस्कृति मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहकार्याने ‘प्रोजेक्ट अमृत’ची सुरुवात केली. या उपक्रमाचा उद्देश केवळ जलस्रोतांची स्वच्छता नसून, जलसंवर्धन हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनविण्याचा आहे.
नद्या, तलाव, विहिरी, झरे यांसारख्या नैसर्गिक जलस्रोतांच्या संरक्षणासाठी राबविण्यात आलेल्या या महाअभियानाच्या पहिल्या दोन टप्प्यांना अभूतपूर्व यश मिळाले होते. यावर्षी तिसरा टप्पा अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात आला.
देशभरात ९०० हून अधिक शहरांमध्ये अभियान
या अभियानांतर्गत देशातील २७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील ९०० हून अधिक शहरांमध्ये १६०० पेक्षा जास्त ठिकाणी एकाच वेळी स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला. सुमारे १० लाख स्वयंसेवकांनी सहभाग नोंदवत जलसंवर्धनाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविला. इंद्रप्रस्थ, जेएनयू व दिल्ली विद्यापीठातील युवकांचाही सहभाग लाभला.
मेहकर युनिटचा उत्स्फूर्त सहभाग
मेहकर युनिटच्या वतीने पैनगंगा नदीकाठी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमात मुखी सत्यनारायण सौभागे, सेवादल संचालक प्रकाश अवताडे, शिक्षक संजय माने, संतोष उबाळे, प्रमोद देशमुख, विष्णू माने, युवराज सरसंडे, शुभम अंभोरे, मदन बोरुडे, गजानन बोदडे, निलेश अंभोरे, विनोद शिरलोढे, ज्ञानेश्वर माने, संतोष कुंभार, हरिदास कुंभार, अथर्व धोंडगे, नकुल सहदेव, आयुष अवताडे, जयश्री डव्हळे, कविता पाटील, सीमा गायकवाड, भक्ती गायकवाड, निकिता अंभोरे, वैशाली अवताडे, पारबाई माने, छाया सोनने, विजया शिरलोढे, अंजली भंसाली, कुसुबेताई, अंजली धोंडगे, श्रद्धा धोंडगे, मायाताई खंडारे यांच्यासह असंख्य सेवेकऱ्यांनी योगदान दिले.
नगर परिषदेचे अख्तर साहेब व कर्मचारी यांचेही सहकार्य लाभले.
या उपक्रमामुळे जलसंवर्धनाबाबत जनजागृती होऊन स्वच्छतेचा संदेश अधिक प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचला आहे.

0 9 7 1 9 7
Users Today : 27
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *