शेंगाव | समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा संपन्न

KHOZ MASTER
1 Min Read

शेंगाव प्रतिनिधी :

२३ फेब्रुवारी २०२६ चिंचोली फाटा, सुवर्णा खामगाव रोड, शेंगाव येथे आज जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचा समस्या मार्गदर्शन आणि दर्शन सोहळा उत्साहात आयोजित करण्यात आला.
या सोहळ्यास मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थित राहून महाराजांचे आशीर्वाद घेण्यात आले. श्रद्धा, भक्ती आणि आध्यात्मिक वातावरणात हा सोहळा पार पडला.
जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने मरणोत्तर देहदान, आरोग्य सेवा, ॲम्बुलन्स सेवा आदी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. हे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून सेवाभावाची शिकवण देत आहेत.
या कार्यक्रमामुळे परिसरात धार्मिक व सामाजिक एकात्मतेचे वातावरण निर्माण झाले.

0 9 4 8 0 5
Users Today : 45
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *