सुलतानपूर येथे डॉ. आर. एन. लाहोटी पॉलीटेक्निकचा माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात

KHOZ MASTER
2 Min Read

सुलतानपूर प्रतिनिधी :

Dr. R. N. Lahoti Polytechnic Sultanpur येथे १२ फेब्रुवारी २०२६ रोजी माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात व आनंददायी वातावरणात संपन्न झाला. विविध वर्षांतील माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. प्राचार्य अतुल पडधान यांनी उपस्थितांचे स्वागत करून संस्थेच्या प्रगतीचा सविस्तर आढावा मांडला. गेल्या काही वर्षांत शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी, अत्याधुनिक प्रयोगशाळांची उभारणी, औद्योगिक भेटी, कॅम्पस प्लेसमेंट तसेच विविध कौशल्यविकास उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
संस्थेचे अध्यक्ष संजूभाऊ लाहोटी व सचिव सोमेशजी लाहोटी यांनी माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधत संस्थेच्या सर्वांगीण विकासात त्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. माजी विद्यार्थी हे संस्थेचे खरे “ब्रँड अ‍ॅम्बेसेडर” असून त्यांच्या यशामुळे संस्थेचा गौरव वाढतो, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा नागपूर येथील ‘होप कॉन्फ्लिक्ट’ संस्थेत कार्यरत श्री. धनरेश अवस्थी यांनी “एम्प्लॉयेबिलिटी स्किल्स फॉर इंडस्ट्री रेडीनेस” या विषयावर मार्गदर्शन केले. उद्योग क्षेत्रातील सध्याच्या गरजा लक्षात घेऊन तांत्रिक कौशल्यांसोबत संवादकौशल्य, टीमवर्क, समस्या सोडवण्याची क्षमता, नेतृत्वगुण आणि व्यावसायिक दृष्टिकोन विकसित करण्याचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. तसेच मुलाखत तयारी, प्रभावी रेझ्युमे लेखन व आत्मविश्वास वृद्धीबाबत उपयुक्त मार्गदर्शन केले.
यावेळी विविध क्षेत्रांत यश मिळवलेल्या इतर माजी विद्यार्थ्यांनीही आपल्या अनुभवांचे कथन करत विद्यार्थ्यांना प्रेरित केले. सातत्य, कष्ट आणि सकारात्मक दृष्टीकोन यशासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. काही माजी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या विकासासाठी सहकार्य करण्याची तयारीही दर्शवली.
कार्यक्रमात सांस्कृतिक सादरीकरण, संवाद सत्र व समूह छायाचित्रणाचे आयोजन करण्यात आले होते. अनेक वर्षांनी भेट झाल्यामुळे माजी विद्यार्थी, शिक्षक व व्यवस्थापन यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. भविष्यातही अशा प्रकारचे मेळावे नियमितपणे आयोजित करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. काकडे यांनी तर आभार प्रदर्शन ग्रंथपाल देवानंद चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राध्यापक व कर्मचारी वर्गाने विशेष परिश्रम घेतले.

0 9 4 8 0 5
Users Today : 45
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *