डोणगाव : शेतकऱ्याच्या बंद घरावर घरफोडी; ₹४४,८०० चा ऐवज लंपास

KHOZ MASTER
1 Min Read

डोणगाव प्रतिनिधी :

शेतीकामासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ₹४४ हजार ८०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना नागापूर येथे घडली. याप्रकरणी डोणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागापूर येथील रहिवासी संतोष खनपटे (वय ५०) हे २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता पत्नीसह शेतात कामासाठी गेले होते. रात्री त्यांचा मुक्काम शेतातच होता. दरम्यान, २३ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे अडीच वाजता शेजाऱ्यांच्या लक्षात घराचे कुलूप तुटलेले असल्याचे आले.
खनपटे यांनी घरी येऊन पाहणी केली असता, घरातील कपाट फोडून चोरट्यांनी ८ ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत ₹४०,३००) व ₹४,५०० रोख असा एकूण ₹४४,८०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे आढळले.
डोणगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
परिसरात वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी नागरिकांना घर बंद ठेवताना योग्य सुरक्षा उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.

0 9 4 7 9 8
Users Today : 38
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *