मेहकर : स्व. ई. आर. पाटील सर स्मृतिप्रीत्यर्थ भव्य खुली कबड्डी स्पर्धा

KHOZ MASTER
1 Min Read

मेहकर प्रतिनिधी :

मैदानी खेळांची संस्कृती जोपासण्यासाठी आणि स्थानिक खेळाडूंना संधी उपलब्ध करून देण्यासाठी बालाजी नेत्रालय व क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. ई. आर. पाटील सर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शनिवार, २८ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजेपासून भव्य खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
हा क्रीडा सोहळा शहरातील भारतीय ज्ञानपीठ (पोलीस स्टेशनच्या मागे) मैदानावर रंगणार आहे.
आकर्षक बक्षिसे
विजेत्या संघांना भरघोस रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत:
प्रथम क्रमांक – ₹३१,०००
द्वितीय क्रमांक – ₹२१,०००
तृतीय क्रमांक – ₹११,०००
चतुर्थ क्रमांक – ₹७,०००
वैयक्तिक पुरस्कार
बेस्ट रेडर – ₹१,०००
बेस्ट डिफेंडर – ₹१,०००
बेस्ट ऑल राऊंडर – आकर्षक फोटो फ्रेम
स्पर्धेचे नियम
प्रवेश शुल्क – ₹७००
तक्रार शुल्क – ₹१,०००
प्रवेश अर्जाची अंतिम मुदत – २८ फेब्रुवारी २०२६
सामने अखिल भारतीय कबड्डी नियमानुसार पार पडतील
पंचांचा निर्णय अंतिम राहील
संघरचना – ६ + १ खेळाडू
खेळाडूंच्या जीविताची जबाबदारी स्वतःची राहील
संपर्कासाठी
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी:
श्री. गोवर्धन राठोड – ९५५२८१९९४९
बालाजी मेडिकल, मेहकर – ९४२३४४६४२०
डॉ. मोहन राजदेरकर – ९४२३२४०१५५
परसुवाले सर, भारतीय ज्ञानपीठ – ७०५७४७९५५५
या स्पर्धेत जास्तीत जास्त संघांनी सहभाग नोंदवून कबड्डीप्रेमींनी या क्रीडा सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजक डॉ. पाटील सर व क्रीडा भारतीचे जिल्हाध्यक्ष डॉ. मोहन राजदेरकर यांनी केले आहे.

0 9 4 7 9 8
Users Today : 38
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *