चिखली प्रतिनिधी :
चिखली नजीकच्या खामगाव–जालना महामार्गावरील बेराळा फाटा येथे आज सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. भरधाव एसटी बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे.
मृत व्यक्तीची ओळख संजय पांडुरंग गायकवाड (वय ५८, रा. केळवद, ता. चिखली) अशी झाली आहे. ते पत्नी शिला संजय गायकवाड (वय ५०) यांच्यासह केळवदहून जाभोरा येथे देवदर्शनासाठी जात होते.
दरम्यान, संभाजीनगर ते हिंगणघाट मार्गावर धावणाऱ्या एसटी बसने बेराळा फाटा येथे त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की संजय गायकवाड यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत जखमी शिला गायकवाड यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
या घटनेमुळे केळवद परिसरात शोककळा पसरली असून पुढील तपास चिखली पोलीस करत आहेत.
Users Today : 38